डॉ. बाबा साहेब आंबेडकर एक युग पुरुष ......

Last Updated: शनिवार, 21 मार्च 2020 (10:58 IST)
डॉ. बाबासाहेबांचे पूर्ण नाव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर आहे. यांचा जन्म दिनांक 14 एप्रिल 1891 रोजी मध्यप्रदेशातील इंदूर जवळ महू येथे रामजी मालोजी सकपाळ आणि भीमाबाई यांच्याकडे झाला. यांचे वडील इंडियन आर्मीत सुभेदार होते. तीन वर्षानंतर त्यांचे वडील सेवानिवृत्त झाल्यावर त्यांचे संपूर्ण कुटुंब महाराष्ट्रातील साताऱ्यात स्थायिक झाले.

हे आपल्या आई- वडिलांचे 14 वे आणि शेवटचे अपत्य होते. बाबासाहेब महाराष्ट्रातील मराठी परिवाराचे होते. त्यांचे मुळ गाव रत्नागिरी जिल्ह्यातील आंबवडे असे. हे जातीने महार असल्याने त्यांच्यासोबत सामाजिक आणि आर्थिक स्वरूपात मोठा भेदभाव केला जात होता. लहानपणा पासूनच त्यांची अभ्यासात रुची होती. ते कुशाग्र आणि
तल्लख बुद्धीचे होते. यांचे वडील आर्मीत असल्याने त्यांचा शिक्षणासाठी विशेष अधिकार दिले जात असे. पण तिथे पण दलित असल्याचा भेदभाव केला जात असे. त्या काळात त्यांचा जातीचा विद्यार्थींना वर्गात बसण्याची तसेच शाळेतील टाक्यांचे पाणी पिण्याची कसलीही मुभा नव्हती. त्यांना शाळेतील चपराशी देखील वरून हातावर पाणी टाकत असे. ते चपराशी रजेवर असल्यास पाणी पिण्यासाठी मिळत नसे. अश्या विषम परिस्थितीतही बाबासाहेब उच्च विद्या विभूषित झाले.

ह्यांनी आपले प्रारंभिक शिक्षण दापोलीत घेतले. मुंबईतील एल्फलिंस्टन हाय स्कुलाला प्रवेश घेतले. 1907 साली त्यांनी मेट्रिकची पदवी घेतली. 1908 ला डॉ. ने एलफ्न्सिटन कॉलेजला प्रवेश घेऊन इतिहास घडवला. त्यांनी 1912 साली मुंबई विश्वविद्यालयातून पदवी परीक्षा उत्तीर्ण केली. फारसी भाषेतून उत्तीर्ण झाले. महाविद्यालयातून त्यांनी अर्थशास्त्र आणि राजनीती विज्ञान विषयातून पदवी प्राप्त केली. 1915 साली ह्यांनी अमेरिकेतील कोलंबिया विश्वविद्यालयातून समाजशास्त्र, इतिहास, दर्शनशास्त्र, मानवविज्ञान, अर्थशास्त्रातून एम.ए ची पदवी घेतली. या नंतर त्यांनी प्राचीन भारताचे वाणिज्य या विषयांवर संशोधन केले.

1916 साली अमेरिकेतील
कोलंबिया विश्वविद्यालयातून आंबेडकर यांना पी.एच.डी. मिळाली. त्यांचा शोध प्रबंधाचा विषय "ब्रिटिश भारतात प्रांतीय वित्त याचे विकेंद्रीकरण होता. फेलोशिप संपल्यावर भारतात येण्याच्या आधी स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स या विषयात एम.एस.सी. आणि डी.एस.सी. आणि विधी संस्थानात बार एट.लॉ. साठी रजिस्ट्रेशन केले आणि भारतात परत आले. आल्यानंतर त्यांनी बडोदाच्य राजांचा दरबारात सैनिक अधिकारी आणि वित्तीय सल्लागाराची जबाबदारी पत्करली. राज्याचे रक्षा सचिव म्हणून देखील काम केले. जाती वाद्यांच्या झळा येथे पण लागल्या. त्यामुळे ह्यांना राहण्यासाठी घर देखील नव्हते. यांनी लवकरच सैन्य मंत्री पदावरूनही राजीनामा दिला
आणि एक खासगी शिक्षक आणि अकाऊंटंटची नोकरी स्वीकारली. सल्लागार म्हणून व्यवसाय केला.

1921 साली लंडन स्कूल ऑफ इकॉनामिक्स अँड पॉलिटीकल सायन्स मधून मास्तर डिग्री मिळवली. 1927 साली अर्थशास्त्रातून डी.एस.सी. केले. न्याय शास्त्राचा अभ्यास करून बॅरिस्टर म्हणून काम केले. 8 जून 1927 रोजी कोलंबिया विश्वविद्यालयाद्वारे डॉक्टरेट पदवीने सन्मानित केले. यांचा विवाह 1906 साली रमाबाई यांच्याशी
झाला. यांना एक पुत्ररत्न झाले. त्यांचे नाव यशवंत असे. 1935 साली त्यांच्या बायकोचे दीर्घ आजाराने निधन झाले.

1940 साली त्यांना अनेक आजारांनी ग्रसित केले. त्याचा उपचारासाठी ते मुंबईला गेले असताना त्यांची भेट डॉक्टर शारदा यांच्याशी झाली. त्यांच्याशी यांनी विवाह केला. डॉ शारदांने आपले नाव बदलून सविता आंबेडकर केले. बाबासाहेबांनी जाती पातीचा विरोध केला. भेदभावाच्या विरुद्ध लढले. त्यासाठी त्यांनी "सभा" संघटन पर्यायाची निवड केली. या संघटनेचा मुख्य उद्देश्य मागासलेल्या वर्गात शिक्षण देण्याचा आणि सामाजिक आणि आर्थिक सुधारण्या बाबत होता. त्यांनी कालकापूरच्या महाराजांच्या सहयोगाने "मूकनायक" या सामाजिक पात्राची स्थापना केली.

यांचे निधन 6 डिसेंबर 1956 रोजी दिल्लीतील त्यांच्या राहत्या घरी दीर्घ आजाराने झाले. बौद्ध धर्म स्वीकारल्याने त्यांचे अंतिम संस्कार केले गेले.

त्यांनी अस्पृश्यतेला मिटविण्यासाठी सक्रिय रूपाने कार्य केले. यासाठी त्यांनी अहिंसेचा मार्ग पत्करला. यांनी दलितांच्या उत्थानासाठी अनेक कार्य केले. समाजात त्यांचे दिलेले योगदान आणि त्यांचा सन्मानासाठी त्यांच्या स्मारकाची स्थापना केली. त्यांचा जन्मदिन 14 एप्रिल आंबेडकर जयंतीच्या रूपाने साजरा केला जातो. या दिनाला भीम जयंती असेही म्हटले जाते. यांनी आपल्या देशाला सामाजिक, आर्थिक, राजनैतिक, शैक्षणिक, धार्मिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक, साहित्यिक, औद्योगिक, संवैधानिक अश्या वेगवेगळ्या क्षेत्रात कार्ये करून आपले अमूल्य योगदान देशासाठीचे दिले आहे. हे देश यांचे सदैव ऋणी राहील. त्यांना अनेक सन्मानाने सन्मानित केले आहे. त्यांना भारतरत्न या पारितोषकाने सन्मानित केले आहे.


यावर अधिक वाचा :

Mi 10i आज 108 मेगापिक्सेल कॅमेर्‍यासह भारतात लॉन्च होईल! ...

Mi 10i आज 108 मेगापिक्सेल कॅमेर्‍यासह भारतात लॉन्च होईल! किंमत किती असेल जे जाणून घ्या
शाओमी (Xiaomi) 2021 च्या पहिल्या व्हर्च्युअल लाँच इव्हेंटसाठी सज्ज आहे. कंपनी आज (5 ...

New Covid lockdown in England: नवीन कोरोना विषाणूच्या ...

New Covid lockdown in England: नवीन कोरोना विषाणूच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा ब्रिटनमध्ये कडक लॉकडाउन लागू करण्यात आला
बोरिस जॉनसन यांनी लोकांना या घोषणेसह घरी राहण्याचे आवाहन केले. लॉकडाऊनच्या घोषणेनंतर आता ...

लॉकडाउननंतर मद्यपान करणार्‍यांची संख्या दुप्पट, रूग्णालयात ...

लॉकडाउननंतर मद्यपान करणार्‍यांची संख्या दुप्पट, रूग्णालयात 48.5 टक्के रुग्ण पोहोचले
कोरोना साथीच्या चिंतेमुळे एकीकडे लोक स्वत:ला घरातच कैद करू लागले. दुसरीकडे, लोकांनीही ...

बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ

बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ
राज्य मंडळातर्फे घेण्यात येणार्‍या बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास १५ डिसेंबरपासून ...

गजबजलेल्या रस्त्यावर एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची ...

गजबजलेल्या रस्त्यावर एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची हत्या
मुंबईच्या गजबजलेल्या रस्त्यावर एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची हत्या करत ...

शरद पवार यांची सिरमला भेट

शरद पवार यांची सिरमला भेट
सीरम इन्स्टिट्यूटमध्ये लागलेल्या आगीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ...

खुशखबर, पहिल्या टप्प्यातली नोकर भरती सुरु

खुशखबर, पहिल्या टप्प्यातली नोकर भरती सुरु
राज्यात नोकरभरतीला सुरुवात झाली आहे. गृह विभागात ५ हजार २९७ पदांसाठी भरती केली जात आहे, ...

नाशिकमध्ये ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २६ ते २८ ...

नाशिकमध्ये ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २६ ते २८ मार्चला होणार
नाशिकमध्ये संपन्न होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या तारखा ठरविण्यात ...

'राष्ट्रवादी परिवार संवाद दौऱ्या'ची घोषणा, राज्यातील १४ ...

'राष्ट्रवादी परिवार संवाद दौऱ्या'ची घोषणा,  राज्यातील १४ जिल्ह्यांमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधणार
"प्रत्येक पक्षाला पक्ष वाढविण्याचा अधिकार आहे. मात्र, स्वतंत्र निवडणूक लढविण्याचा अजिबात ...

बाळासाहेब ठाकरे यांचं नाव 'बाळ' ठेवलं कारण...

बाळासाहेब ठाकरे यांचं नाव 'बाळ' ठेवलं कारण...
आज बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिन आहे. त्यानिमित्ताने ही बातमी पुन्हा प्रसिद्ध करत ...