1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 21 मार्च 2020 (09:27 IST)

करोना जनजागृतीसाठी बॉलीवूडचा पुढाकार

Bollywood's initiative
करोनाच्या जनजागृतीसाठी सरकारला मदत व्हावी आणि नागरिकांमध्ये जनजागृती करता यावी यासाठी बॉलिवूड कलाकार एकत्र आल्याचं पाहायला मिळत आहे. नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टीने एक लघुपट तयार केला असून मुख्यमंत्री कार्यालयाने हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. या लघुपटामध्ये अमिताभ बच्चनपासून वरुण धवनपर्यंत अनेक कलाकारांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या लघुपटातून या कलाकारांनी नागरिकांना आरोग्याची काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. तसचं या काळात कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या करु नयेत हेदेखील सांगितलं आहे.
 
दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी रोहित शेट्टीसह या लघुपटात झळकलेल्या कलाकारांचे आभार मानले आहेत.