मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. जन्मदिवस आणि ज्योतिष
Written By

दैनिक राशीफल (14.05.2018)

मेष : यश देणारा कालखंड. सहकार्य मिळत राहिल्याने आत्मविश्वास वाढेल. नवीन वातावरण उत्साह निर्माण करेल. फायद्याच्या योजनांवर चर्चा होईल. शुभवार्ता समजतील. नोकरी बढती संभवते. प्रतिष्ठा मिळेल. 
 
वृषभ : आर्थिक योग अनुकूल. खरेदी कराल. कुटूंबातून चांगली बातमी कळेल. शुभ कार्यात सक्रिय सहभाग घ्याल. प्रॉपर्टी, वाहन खरेदीचे योग संभवतात. प्रवास योग संभोवतो.
 
मिथुन : कुटुंबातील वाद मिटतील. व्यापार-व्यवसायात यश येईल. नोकरीत मानाचे पद संभवते. स्वभावावाला औषध नाही असे म्हणातात पंरतू ते तुम्हाला शोधावे लागणार आहे. 
 
कर्क : एखाद्या चांगल्या योजनावर चर्चा होईल. आपल्या कार्यातून प्रभाव पाडाल. अधिक प्रसन्न राहाल. कौटूंबिक कार्यात सहभाग घ्याल.
 
सिंह : व्यापारातील अडचणी दूर होतील. नोकरीत बढतीचे योग. आवक वाढल्याने किमती वस्तुची खरेदी करू शकाल. कुटुंबात उत्साहाचे वातावरण राहिल. 
 
कन्या : अनुभवाचा फायदा करून घ्यावा. विरोधकांचा अंदाज घ्यावा लागेल. आर्थिक योग उत्तम राहील. नोकरीत वरिष्ठांकडून उचित सहकार्य लाभेल. प्रवास योग संभवतो. 
 
तूळ : मानसिक थकवा जाणवणार नाही. अनुभवाचा चांगला वापर करता येईल. कुटूंबात उत्साहाचे वातावरण राहील. नोकरीच्या संधी येतील. प्रवास योग संभवतो.
 
वृश्चिक : संधीचा वेळेनुसार उपयोग करून घ्या. परिश्रमाचे चीज होईल. अपेक्षीत यश मिळेल. नोकरी- व्यवसायात लाभ मिळेल. आर्थिक योग उत्तम आहे. मनाप्रमाणे खर्च करता येईल. 
 
धनू : कामात मन लागेल. अनुभव व कार्यक्षमता यांची योग्य सांगड घालणे शक्य होईल. चांगल्या संधी येतील. न्याय प्रविष्ठ कामात यश मिळले. अचानक लाभ होईल. कुटुंबात शुभ कार्य होतील. 
 
मकर : फलदायी काळ. मनाप्रमाणे यश मिळेल, इच्छा पूर्ण होतील. उत्तरोत्तर प्रगती होईल.  योग्य-अयोग्य निर्णय वेळेवर घ्यावा लागेल. कार्यक्षमतेत वाढ होईल. त्याचा तुमच्या कामावर अनुकूल परिणाम जाणवेल. 
 
कुंभ : शुभकार्यात सहभाग वाढेल. आर्थिक योग उत्तम. अडकलेला पैसा मोकळा होईल. आर्थिक व्यवहार करताना सावध रहा. कामाच्या संदर्भात संक्रिय रहावे लागेल. प्रवास योग अनुकूल. 
 
मीन : वरिष्ठांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभेल. कुटुंबात शुभकार्य होईल. चांगली बातमी कानी पडेल. इच्छा पूर्ण होईल. कार्यक्षमतेत वाढ झाल्याचे लक्षात येईल.