गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: रविवार, 14 जून 2020 (15:59 IST)

'सुशांत सिंह राजपूत' बद्दल 10 गोष्टी

1. सुशांत सिंह राजपूत याच जन्म 21 जानेवारी 1986 मध्ये पटना येथे झाला होता. त्याला चार बहिणी आहेत. त्याचे वडील एक शासकीय कर्मचारी होते आणि 2000 साली त्याचे कुटुंब दिल्लीला शिफ्ट झाले होते.
 
2. सुशांत अभ्यासात हुशार होता आणि अभिनयात देखील. त्याने ऑल इंडिया इंजिनियरिंग एंट्रेंस एक्जामिनेशन 2003 मध्ये 7वी रँक पटकावली होती. शाळेनंतर त्याने दिल्लीच्या इंजिनियरिंग कॉलेजहून मेकॅनिकल इंजीनियरिंगचा अभ्यास केला होता.
 
3. सुशांत प्रसिद्ध डांस ग्रुप शामक डावरच्या ग्रुपमध्ये डांस करायचा आणि त्याने 51 व्या फिल्मफेयर समारंभात बॅक डांसर म्हणून भाग घेतला होता.
 
4. मुंबई आल्यावर सुशांतने नादिरा बब्बरचे थिएटर ग्रुप ज्वाइन केले सोबतच बॅरी जॉन अॅकडमीहून अभिनयाचे धडे घेतले.
 
5. 2008 मध्ये 'बालाजी टेलीफिल्म्स' च्या एक प्लेसाठी सुशांत सिंह राजपुतने ऑडिशन दिले आणि त्याला सीरियल 'किस देश में है मेरा दिल' यात 'प्रीत जुनेजा' ची भूमिका मिळाली.
 
6. 2009 मध्ये सुशांतने 'पवित्र रिश्ता' मध्ये मानवची भूमिका निभावून घराघरात आपली ओळख निर्माण केली. लोक त्या सुशांत नव्हे तर मानव या नावाने ओळखायचे.
 
7. सुशांतने 'काई पो छे' या चित्रपटातून बॉलीवुडमध्ये डेब्यू केले होते. त्याने आपल्या करिअरमध्ये एकापेक्षा एक ‍यशस्वी सिनेमे दिले.
 
8. सुशांत आपल्या दुसर्‍या सिनेमा 'शुद्ध देसी रोमांस' मध्ये वाणी कपूर आणि परिणीति चोपडासह दिसले होते तर क्रिकेटर महेंद्र सिंह धोनीच्या बायोपिकमध्ये शानदार अभिनयामुळे त्याची वेगळीच ओळख निर्माण झाली होती.
 
9. सुशांतने लग्न केले नव्हते परंतू 'पवित्र रिश्ता' मध्ये आपल्या को-स्टार अंकिता लोखंडे सह रिलेशनशिपमध्ये असल्यामुळे चर्चेत होते. शो संपल्यावर त्यांच्या नात्यात दुरावा आला आणि दोघेही आपआपल्या मार्गावर निघून गेले.

10. अलीकडे सुशांतच नाव अभिनेत्री रिया चक्रवर्तीसोबत घेतलं जात होतं. दोघांचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल असायचे.