मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 24 ऑगस्ट 2019 (10:31 IST)

'छिछोरे'चा दुसरा दोस्ती स्पेशल दुसरा ट्रेलर प्रदर्शित

बहुचर्चित 'छिछोरे' चित्रपटाचा दुसरा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. रिलीज करण्यात आलेल्या या ट्रेलरला दोस्ती स्पेशल असं नाव देण्यात आलं आहे. 
 
'छिछोरे'चा दोस्ती स्पेशल ट्रेलर प्रत्येकाला त्याच्या कॉलेजच्या दिवसांची, कॉलेजमध्ये, हॉस्टेलमध्ये केलेल्या मजा-मस्तीची नक्कीच आठवण करुन देईल. येत्या ५ सप्टेंबर रोजी 'छिछोरे' चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
 
चित्रपटाचं कथानक इंजिनियरिंगच्या विद्यार्थ्यांवर केंद्रित असून विद्यार्थी अभ्यासात कमी आणि इतर कामांमध्येच अधिक लक्ष देताना दिसतात. चित्रपटाचं शूटिंग एका इंजिनियरिंगच्या कॉलेजमध्ये करण्यात आलं आहे. सुशांत, श्रद्धाने प्रमुख भूमिका साकारली असून प्रतीक बब्बर सुशांतच्या मित्राची भूमिका साकारत आहे.
 
'छिछोरे'मध्ये सुशांत सिंह राजपूत आणि श्रद्धा कपूर प्रमुख भूमिका साकारत आहेत. सुशांत, श्रद्धाव्यतिरिक्त चित्रपटात कॉनेडियन वरुण शर्मा, नवीन शेट्टी, सहर्ष कुमार, ताहिर राज भसीन, तुषार पांडे आणि प्रतीक बब्बरही भूमिका साकारणार आहे.