गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

‘जबरा फॅन’ चा आदित्य चोप्राला फटका

अभिनेता शाहरुख खानच्या ‘फॅन’ चित्रपटामध्ये ‘जबरा फॅन’ हे गाणे दाखवले नसल्याने निर्मात्याला 15 हजाराचा दंड ठोठावण्यात आला आहे. औरंगाबादमधील आफरीन फातिमा आणि त्यांची दोन मुले चित्रपट पाहण्यासाठी गेले होते. मात्र त्यांना चित्रपटात हे गाणे दिसले नाही. त्यामुळे त्यांनी राज्य ग्राहक आयोगात अपील दाखल केले होते. त्यावर कारवाई करत आयोगाने निर्माता आदित्य चोप्रा यांनी तक्रारदारास मानसिक त्रासापोटी दहा हजार रुपये आणि तक्रारीच्या खर्चापोटी पाच हजार रुपये देण्याचे आदेश दिले.

15 एप्रिल 2016 रोजी औरंगाबादच्या पीव्हीआर थिएटरमध्ये ‘फॅन’ हा चित्रपट लागला होता. शहरातील आफरीन फातिमा आणि त्यांची दोन मुले नबील, प्लोरा यांसोबत कुटुंबातील इतर 7 सदस्य चित्रपट पाहण्यासाठी गेले होते. हा चित्रपट केवळ ‘जबरा फॅन’ हे लोकप्रिय गाणे असल्याने पाहण्यासाठी मुलांनी आग्रह केला होता. मात्र संपूर्ण चित्रपटामध्ये ‘जबरा फॅन बन गया’ हे गाणे दाखवण्यात आले नाही. त्यामुळे मुले नाराज झाली. या निणर्याविरोधात आफरीन फातेमा यांनी राज्य ग्राहक आयोगात अपील दाखल केले.