शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 24 ऑक्टोबर 2024 (12:12 IST)

अभिनेता सलमान खानकडे 5 कोटींची खंडणी मागणाऱ्याला जमशेदपूर मधून अटक

मुंबई ट्रॅफिक पोलिसांना गेल्या आठवड्यात अभनेता सलमान खानबाबत धमकीचा मेसेज आला होता. यामध्ये आरोपीने अभिनेत्याकडे 5 कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. त्याचवेळी मुंबई पोलिसांनी मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीला जमशेदपूर, झारखंड येथून अटक केली आहे. आरोपी जमशेदपूर येथील भाजीविक्रेता आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार बॉलिवूड अभिनेता सलमान खानला धमकीचा संदेश पाठवणाऱ्या व्यक्तीला मुंबई पोलिसांनी बुधवारी अटक केली असून मुंबईच्या वरळी पोलिसांनी त्याला झारखंडच्या जमशेदपूर येथून अटक केली आहे. गेल्या आठवड्यात मुंबई वाहतूक पोलिसांना सलमानबाबत धमकीचा मेसेज आला होता आणि 5 कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. आता जमशेदपूरच्या स्थानिक पोलिसांच्या मदतीने मेसेज पाठवणाऱ्याला अटक करण्यात आली आहे.