शुक्रवार, 29 ऑगस्ट 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : शुक्रवार, 18 ऑक्टोबर 2024 (11:06 IST)

धमकीनंतर अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर वाढवण्यात आली सुरक्षा

धमकीनंतर अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर वाढवली सुरक्षा
बॉलिवूड अभिनेता सलमानला धमक्या देण्यात आल्या असून त्यानंतर सलमान खानच्या घराबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. तसेच आजूबाजूच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवण्यात आले आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार चित्रपट अभिनेता सलमान खानला धमकावल्याची बातमी समोर आली असून त्यानंतर मुंबई पोलिसांनी सलमानच्या घराबाहेर सुरक्षा कडक केली आहे आणि प्रत्येक हालचालीवर सतत लक्ष ठेऊन आहे. मुंबई वाहतूक पोलिसांना व्हॉट्सॲप नंबरवर एक मेसेज आला होता. या मेसेजमध्ये अभिनेता सलमानबद्दल धमकी लिहली होती की, त्याने याला हलके घेऊ नका अन्यथा सलमान खानची अवस्था बाबा सिद्दीकीपेक्षा खूप वाईट होईल. हे संपूर्ण प्रकरण संपवण्यासाठी आरोपींनी 5 कोटी रुपयांची खंडणीही मागितली. त्यानंतर पोलिसांनी हा मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीची चौकशी सुरू केली आहे.

Edited By- Dhanashri Naik