शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : शनिवार, 27 जुलै 2024 (11:22 IST)

एक कलाकार तारक मेहता का उल्टा चष्मा मधून बाहेर, 16 वर्षांपासून करत होता ही भूमिका

प्रसिद्ध टीव्ही शो 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मागील 16 वर्षांपासून लोकांच्या मनावर राज्य करीत आहे. लहान्यांपासून मोठ्यांपर्यत सर्वाना ही मालिका खूप आवडते. या शो मधील काम करणाऱ्यांना चाहत्यांचे भरपूर प्रेम मिळाले. 
 
तसेच अनेक जुन्या कलाकारांनी हा शो सोडला. व त्यांच्या जागी नवीन कलाकारांची एंट्री झाली. तसेच आता या शो मध्ये गोली ची भूमिका पार पडणारा कुशल शाह ने देखील आता मालिका सोडली आहे. आता त्याच्या जागेवर नवीन गोली ची एंट्री झाली आहे. तसेच कुशल शाह ने एका व्हिडीओ मध्ये सांगितले की, जेवढे प्रेम चाहत्यांनी मला दिले तेवढेच प्रेम गोकुलधाम सोसायटीमधील लोकांनी मला दिले. मी लहान पाणापासून इथे काम करीत आहे आणि मोठा देखील इथे झालो.