शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 30 एप्रिल 2019 (09:22 IST)

कारन जोहरच्या धर्मा प्रोडक्शनच्या गोदामाला भयानक आग गोदाम जळून खाक

मुंबई येथील गोरेगाव परिसरातील कामा इंडस्ट्रीमध्ये मध्यरात्री भीषण आग लागली. धर्मा प्रॉडक्शन हे हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहर याच्या मालकीचे आहे. गोरेगाव येथेच धर्मा प्रॉडक्शनचं गोदाम आहे. सिनेमाच्या शूटिंगसंबंधित साहित्य या गोदामात होती, अशी माहिती मिळते आहे. गोरेगाव येथील कामा इंडस्ट्रीयल इस्टेटमध्ये भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या 12 गाड्या, 8 वॉटर टँकर घटनास्थळी दाखल झाले.  आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले आहेत. यामध्ये आग विझवताना अग्निशमन दलाचा कर्मचारी जखमी झाला आहे. या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही. या आगीवर 5 तासानंतर  नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं. आगीचं कारण अस्पष्ट असून घटनेची चौकशी केली जाईल अशी माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली. मात्र या घटनेत स्टुडीओचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.