शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 20 नोव्हेंबर 2021 (15:02 IST)

आमिर खान-करीना कपूर बैसाखीच्या मुहूर्तावर धूम ठोकणार, 'लाल सिंग चड्ढा' 14 एप्रिलला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार

आमिर खान (Aamir Khan)आणि करीना कपूर(Kareena Kapoor) यांचा 'लाल सिंग चड्ढा ' हा चित्रपट पुढील वर्षीच्या बैसाखीच्या मुहूर्तावर 14 एप्रिल 2022 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. स्वत: करीना कपूर आणि चित्रपट निर्मात्याने सोशल मीडियावर नवीन पोस्टर शेअर करून याबाबत माहिती दिली आहे. 'लाल सिंह चड्ढा'चे नवे पोस्टर समोर येताच सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे.
चित्रपटाचे पोस्टर शेअर करताना करीनाने कॅप्शनमध्ये लिहिले - आमचे नवीन पोस्टर आणि आमची नवीन रिलीज डेट शेअर करताना आम्हाला आनंद होत आहे. पोस्टरमध्ये करीना आमिर खानच्या खांद्यावर डोके ठेवताना दिसत आहे, दोघांच्या चेहऱ्यावरील हसू दोघेही प्रेमात असल्याचे सांगत आहेत. पोस्टरवर 'लाल सिंह चड्ढा' असे लिहिले आहे फक्त या बैसाखीला  चित्रपटगृहा मध्ये #LalSinghOnBaisakhi.
'लाल सिंह चड्ढा' हा चित्रपट आधी 2020 च्या ख्रिसमसला रिलीज होणार होता पण नंतर व्हॅलेंटाईन डेला रिलीज होणार असल्याचे सांगण्यात आले. अनेकवेळा चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलली. मात्र, आता चित्रपटाच्या प्रदर्शनाची निश्चित तारीख समोर आली आहे.
कोरोना व्हायरसमुळे चित्रपटाचे शूटिंग बरेच दिवस थांबले असल्याची माहिती आहे. त्यामुळे निर्माते चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेबाबत कोणतीही निश्चित तारीख सांगत नव्हते. अद्वैत चंदन दिग्दर्शित लाल सिंग चड्ढा हा 1994 साली प्रदर्शित झालेल्या हॉलिवूड चित्रपट फॉरेस्ट गंपचा हिंदी रिमेक आहे. हॉलिवूड चित्रपटात टॉम हँक्स आणि रॉबिन राइट यांनी अभिनय केला आहे.