रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मुंबई , मंगळवार, 24 ऑगस्ट 2021 (18:22 IST)

अभिषेक बच्चनला दुखापत, बिग बी श्वेतासोबत रूग्णालयात पोहोचले

अभिनेता अभिषेक बच्चनला दुखापत झाल्यामुळे संपूर्ण बच्चन कुटुंबिय चिंतेत आहेत. ही दुखापत कुठे झाली? कशी झाली?  याबाबत अद्याप कोणतीच माहिती नाही. मात्र मिळालेल्या माहितीनुसार, अभिषेकला दुखापत झाल्यानंतर 22 ऑगस्ट रोजी रविवारी मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 
 
‘झूम’च्या रिपोर्टनुसार, अमिताभ बच्चन मुलगी श्वेतासोबत अभिषेकला पाहण्यासाठी रुग्णालयात गेले होते. यावेळी अमिताभ बच्चन हुडी घालून पूर्ण चेहरा मास्कने झाकून होते. सोशल मीडियावर अभिषेक बच्चनचा फोटो देखील व्हायरल होत आहे. ज्यामध्ये उजव्या बाजूला दुखापत झाली आहे. 
 
मात्र अभिषेकला कोणती दुखापत झाली? कशी दुखापत झाली? किती दुखापत झाली? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे अनुत्तरीत आहेत. मात्र बच्चन कुटुंबीय रूग्णालयात दिसल्यामुळे ही दुखापत गंभीर तर नाही ना? असा प्रश्न चाहत्यांना पडत आहे.