सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 14 ऑगस्ट 2021 (08:08 IST)

अभिनेता अभिषेक बच्चनने विकला फ्लॅट; किती कोटी आले माहितीय का?

बिग बी अमिताभ बच्चन ज्याप्रमाणे कायमच प्रसिद्धीच्या वलयात राहतात, मात्र तितकी प्रसिद्धी त्यांचा मुलगा आणि बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन याला मात्र मिळत नाही. परंतु सध्या अभिषेक एका वेगळ्याच कारणासाठी प्रसिद्धीच्या झोतात आला आहे. ते म्हणजे त्याने विकलेला फ्लॅट. एक फ्लॅट विकून त्याच्या पदरी तब्बल ४५ कोटी ७५ लाख रुपये पडले आहेत. सहाजिकच याची बॉलीवूडमध्ये नव्हे तर संपूर्ण मुंबईमध्ये चर्चा सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अभिषेकचा मुंबईतील वरळी भागात असलेल्या लक्झरी ओबेरॉय ३६० वेस्ट टॉवर्समध्ये ३७ व्या मजल्यावर एक आलिशान फ्लॅट होता. हा फ्लॅट तब्बल ४५ कोटी ७५ लाख रुपयांना विकला गेला आहे. विशेष म्हणजे याच अपार्टमेंटमध्ये शाहीद कपूर आणि अक्षय कुमार हे त्याच्या शेजारी राहत असत.

अभिषेकचा हा फ्लॅट ७ हजार ५२७ स्क्वेअर फूट एवढा आहे. त्याने २०१४ साली ४१ कोटी रुपयांना तो खरेदी केला होता. तसेच शाहिदने ५६ कोटी तर अक्षयने ५२ कोटी रुपये देऊन खरेदी केला होता. शाहिद आणि मीरा अनेकदा या अपार्टमेंटचे बांधकाम पाहण्यासाठी येतात. त्यांचा फ्लॅट ४३ व्या मजल्यावर आहे.

दरम्यान, कोरोना काळात बॉलिवूड मध्ये चित्रपटसृष्टीला ग्रहण लागल्यानंतर अभिषेक बच्चन हा त्याचा शेवटचा चित्रपट बिग बुल मध्ये दिसला होता. या चित्रपटाने चांगली कामगिरी केली नाही. तर ऐश्वर्या राय बच्चन शेवटची फॅनी खान मध्ये अनिल कपूर आणि राजकुमार राव यांच्यासोबत दिसली होती. तसेच ऐश्वर्या ही लवकरच स्वतःचा चित्रपट घेऊन लवकरच दिग्दर्शकाच्या भूमिकेत दिसून येणार आहे.