शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : बुधवार, 11 ऑगस्ट 2021 (12:06 IST)

प्रकाश राज यांचा अपघात झाला,शस्त्रक्रियेसाठी हैदराबादला रवाना

बॉलिवूड आणि दक्षिण चित्रपटांचे ज्येष्ठ अभिनेते प्रकाश राज अपघाताला बळी पडले, ज्यामुळे त्यांना फ्रॅक्चर झाले आहे. प्रकाश राज यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे ही माहिती दिली आहे.
 
प्रकाश राज यांनी ट्वीट केले,मी माझे मित्र डॉ गुरुवरेड्डी यांच्या सुरक्षित हातांमध्ये शस्त्रक्रियेसाठी हैदराबादला जात आहो.मी ठीक आहे, काळजी करण्याची काहीच गरज नाही. मला तुमच्या प्रार्थनेत सामील करा.
 
ही बातमी समोर आल्यानंतर चाहते प्रकाश राज यांच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत. बॉलिवूड व्यतिरिक्त, प्रकाश राज यांनी तेलुगू, कन्नड,तमिळ,मराठी आणि मल्याळम चित्रपट उद्योगांमध्येही प्रचंड ओळख मिळवली आहे.
 
प्रकाश राज यांनी वॉन्टेड, सिंघम, दबंग 2,मुंबई मिरर,पोलीसगिरी अशा अनेक हिट चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका साकारली आहे.ते मुव्ही आर्टिस्ट असोसिएशन (MMA) च्या अध्यक्षपदासाठी निवडणूक लढत आहेत. हैदराबादमध्ये MAA च्या निवडणुका होणार आहेत.