1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 30 जानेवारी 2023 (12:20 IST)

अभिनेता अन्नू कपूर यांना रुग्णालयातून डिस्चार्ज केले

Bollywood actor Annu Kapoor
बॉलिवूड अभिनेता अन्नू कपूरच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. अभिनेत्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून त्याची प्रकृती आता स्थिर आहे. छातीत दुखू लागल्याने त्यांना दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले. बरे झाल्यानंतर अन्नू कपूरचा एक फोटोही समोर आला आहे, ज्यामध्ये तो डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांसोबत दिसत आहे. फोटोंमध्ये अन्नूसह सर्वांच्या चेहऱ्यावर हसू पाहायला मिळते.
 
काही दिवसांपूर्वी अन्नू कपूर यांनी छातीत दुखत असल्याची तक्रार केली होती, त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. हृदयरोग विभागात दाखल केल्यानंतर ते सतत डॉक्टरांच्या देखरेखीखाली होते. ही बातमी समोर येताच त्याचे चाहते खूप अस्वस्थ झाले आणि ते लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत होते .आता अभिनेता बरे होऊन घरी आले .  
 
अन्नूने आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम केले. श्याम बेनेगल यांच्या मंडी या चित्रपटातून त्यांनी करिअरची सुरुवात केली. यानंतर त्यांनी एकापाठोपाठ अनेक संस्मरणीय भूमिका साकारल्या. चमेली की शादी, 7 खून माफ, जॉली एलएलबी 2, रेनकोट, विकी डोनर, ड्रीम गर्ल यांसारख्या चित्रपटांमधील त्यांच्या अभिनयाने त्यांना  खूप प्रशंसा मिळवून दिली.
 
Edited By - Priya Dixit