गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 11 सप्टेंबर 2021 (11:20 IST)

अपघातात अभिनेता साई धरम तेज गंभीर जखमी,प्रकृती धोक्याबाहेर

तेलुगू चित्रपट अभिनेता साई धरम तेज शुक्रवारी रात्री एका रस्ते अपघातात जखमी झाले. मिळालेल्या माहितीनुसार, ते स्पोर्ट्स बाईक चालवत होते आणि चिखलात घसरले . हैदराबादमधील दुर्गामाचेरुवु केबल पुलाजवळ ही घटना घडली.अपघातानंतर साई बेशुद्ध झाले  होते.त्यांना गंभीर दुखापत झाली आहे. 34 वर्षीय साईला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले जेथे त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. 
 
सुपरस्टार चिरंजीवी यांचे पुतणे साई धरम तेज यांच्या टीमने एक निवेदन जारी केले आहे की, 'साई धरम तेज यांची प्रकृती चांगला प्रतिसाद देत आहे आणि ते बरे होत आहे. काळजी करण्याची काहीच नाही. ते रुग्णालयाच्या देखरेखीखाली आहे.त्याची प्रकृती स्थिर होताच त्याला पुढील उपचारासाठी अपोलो रुग्णालयात नेले जाईल. 
 
पोलिसांनी याबद्दल सांगितले की, 'साई धरम तेजने हेल्मेट घातले होते आणि त्याने दारू प्यायली नव्हती. रस्त्यावरील चिखलात त्याची दुचाकी घसरली. ते  आता धोक्याबाहेर असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. 
 
अपघातानंतर, साईची छायाचित्रे इंटरनेटवर व्हायरल झाली ज्यामध्ये त्यांच्या डोळ्यावर आणि छातीवर जखमेच्या खुणा दिसत आहेत. ही बातमी कळतातच त्याचे कुटुंबातील सदस्य भाई वैष्णव तेज, काका पवन कल्याण, चुलत भाऊ वरुण तेज, निहारिका कोनिडेला आणि मित्र संदीप किशन त्याला भेटण्यासाठी रुग्णालयात पोहोचले. 
 
साईचे काका यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, 'त्यांचा शुक्रवारी संध्याकाळी 7.30 वाजता अपघात झाला. तो आता सुरक्षित आहे. मी डॉक्टरांशी याबद्दल बोललो. उद्यापर्यंत त्याला आयसीयूमधून हलवण्यात येईल आणि तो आमच्याशी बोलण्याच्या स्थितीत असेल. मी इथे सांगू इच्छितो की त्याच्या डोक्याला किंवा पाठीच्या कण्याला कोणतीही इजा नाही आणि तो पूर्णपणे सुरक्षित आहे.त्याच्याशी बोलल्यानंतर आम्ही आणखी अपडेट देऊ.