मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 29 एप्रिल 2022 (11:35 IST)

अभिनेते सलीम घोष यांचे निधन, वयाच्या 70 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

salim gaus
सिनेविश्वातून एक हृदयद्रावक बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ अभिनेते सलीम घोष यांचे निधन झाले. हृदयविकाराच्या झटक्याने सलीमने या जगाचा निरोप घेतला. वयाच्या 70 व्या वर्षी सलीम यांनी मुंबईतील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. बुधवारी रात्री त्यांना छातीत दुखू लागले, त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. पण दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. असे त्यांच्या पत्नी अनिता सलीम घोष यांनी सांगितले. गुरुवारी सकाळी त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला. सलीम यांच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा पसरली असून चाहत्यांसह अनेक सेलिब्रिटींनीही त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. 
 
सलीम घोष यांनी केवळ हिंदीच नाही तर तमिळ, तेलगू, मल्याळम आणि इंग्रजी सिनेमांमध्येही काम केले आहे. चित्रपटांसोबतच सलीम घोष यांनी टीव्ही शोमध्येही आपले कौशल्य दाखवले. त्याचबरोबर त्यांनी थिएटरमध्ये केवळ अभिनेता म्हणूनच नाही तर दिग्दर्शक म्हणूनही काम केले होते. श्याम बेनेगल यांच्या टीव्ही शो भारत एक खोजसाठी सलीम घौस सर्वात जास्त लक्षात ठेवले जातात. त्याचबरोबर त्यांनी अनेक दक्षिण भारतीय चित्रपटांमध्येही अविस्मरणीय कामे केली.