मंगळवार, 17 सप्टेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : मंगळवार, 30 जुलै 2024 (16:08 IST)

अभिनेता शाहरुख खान डोळ्यांचा उपचार घेण्यासाठी अमेरिका जाणार

अभिनेता शाहरुख खान यांच्या डोळ्याला काही त्रास जाणवत होता. त्यासाठी त्यांनी रुग्णालयात जाऊन छोटीशी शस्त्रक्रिया केली. नंतर ते डोळ्यांचा पुढील उपचारासाठी अमेरिकेत जाणार असल्याचे वृत्त आहे. डोळ्यांवर उपचार घेण्यासाठी शाहरुख आज 30 जुलै  रोजी अमेरिकेला जाणार आहे. त्यांना मोतीबिंदू झाल्याचे निदान झाल्यामुळे बरेच दिवस ते मुंबईतील एका मोठ्या रुग्णालयात डोळे तपासत होते. शाहरुखला त्याच्या दोन्ही डोळ्यांमध्ये त्रास होत होता. त्यांनी एका डोळ्याचे उपचार भारतात केले आणि दुसऱ्या डोळ्याचे उपचार ते अमेरिकेत करतील.
 
या बातमीची पुष्टी करण्यासाठी शाहरुखच्या टीमने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. मे महिन्याच्या सुरुवातीला, शाहरुख खानला त्याच्या संघ कोलकाता नाइट रायडर्सच्या आयपीएल सामन्यादरम्यान उष्माघाताचा झटका आल्याने अहमदाबादच्या केडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
 
Edited By- Priya Dixit