गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: रविवार, 3 एप्रिल 2022 (11:43 IST)

अभिनेत्री मलायका अरोराच्या कारचा अपघात, प्रकृती स्थिर

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा हिच्या कारला शनिवारी मुंबईला लागून असलेल्या पनवेल परिसरात अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्रीच्या कारच्या ड्रायव्हरचा तोल सुटला आणि एक्स्प्रेस वेवर इतर 3 गाड्यांना धडकली. अपघातावेळी मलायका अरोरा हिच्या डोळ्याजवळ दुखापत झाल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
 
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, "या घटनेमुळे मलायका अरोरा हादरली आहे, मात्र तिची प्रकृती आता स्थिर आहे. अभिनेत्रीला काही टाके पडले आहेत. डोक्याला कोणतीही मोठी दुखापत नाही. असा दावाही जवळच्या सूत्रांनी केला आहे. मलायका अरोराला रविवारी दुपारपर्यंत घरी जाण्याची परवानगी देण्यात आली आहे.
 
अपघाताच्या वेळी मलायका तिच्या रेंज रोव्हरमध्ये होती आणि तिची कार इतर दोन कारमध्ये अडकली होती. ती एका फॅशन इव्हेंटमध्ये सहभागी होण्यासाठी गेली होती. हा अपघात कसा झाला याचा तपास करून एफआयआर दाखल करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.