शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 3 एप्रिल 2024 (10:03 IST)

अभिनेत्री मोहिना कुमारी दुसऱ्यांदा आई बनली

Mohina Kumari
ये रिश्ता क्या कहलाता है' या लोकप्रिय मालिकेतून घराघरात लोकप्रिय झालेली अभिनेत्री मोहिना कुमारी हिने दुसऱ्या अपत्याला जन्म दिला आहे. घरच्यांनी अगदी जल्लोषात चिमुकलीचे स्वागत केले. मोहिनाच्या एका फॅन पेजने सोशल मीडियावर फोटो शेअर करून ही आनंदाची बातमी दिली आहे. मोहिनाने 2019 मध्ये सुयश रावतसोबत लग्न केले. पहिले अपत्य म्हणून मोहिना आणि सुयश यांना मुलगा अयांशचा जन्म झाला. आता त्यांच्या मुलीच्या आगमनाने त्यांचा घरात आनंद झाला आहे. 
 
मोहिनाने 'नया अकबर बिरबल', 'कुबूल है', 'सिलसिला प्यार का' आणि 'प्यार तूने क्या किया' सारख्या अनेक लोकप्रिय टीव्ही शोमध्ये काम केले आहे. पण, 'ये रिश्ता क्या कहलाता है'मध्ये कीर्ती गोएंका सिंघानियाची भूमिका साकारल्यानंतर तिला लोकप्रियता मिळाली. मुलीच्या जन्मानंतर मोहिनाला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
लग्नानंतर मोहिनाने इंडस्ट्रीला अलविदा केला होता. अभिनयासोबतच मोहिना नृत्यातही निष्णात आहे. प्रसिद्ध कोरिओग्राफर रेमो डिसूझासोबतही त्यांनी काम केले आहे. लग्नानंतर त्यांनी आपला सगळा वेळ कुटुंबासाठी दिला. यावर्षी 13 मार्च रोजी मोहिनाने तिच्या प्रेग्नेंसीची बातमी सोशल मीडियावर शेअर केली होती.

Edited By- Priya Dixit