Pooja Joshi Arora: ये रिश्ता क्या कहलाता फेम अभिनेत्री दुसऱ्यांदा आई बनली
ये रिश्ता क्या कहलाता है' अनेक दशकांपासून टेलिव्हिजन जगतात राज्य करत आहे. त्यातील पात्र प्रत्येक घराघरात प्रसिद्ध झाले आहेत. अक्षराच्या भूमिकेत हिना खान असो किंवा नैतिकच्या भूमिकेत करण मेहरा असो किंवा इतर कोणताही अभिनेता असो, 'ये रिश्ता...'च्या सर्व पात्रांना या शोमधून खूप प्रसिद्धी मिळाली आहे. दरम्यान, या शोमध्ये अनेक नवे चेहरेही पाहायला मिळाले,शोमध्ये अक्षराची वहिनी वर्षा हिची भूमिका साकारणारी अभिनेत्री पूजा जोशी अरोराआई झाली आहे. शुक्रवारी तिने मुलीला जन्म दिला. तिने ही माहिती इंस्टाग्रामवर शेअर केली,
पूजा जोशीने पोस्टमध्ये लिहिले की, 'आज देवाच्या कृपेने मी एका मुलीला जन्म दिला. कृपया आपण सर्वांनी तिला आशीर्वाद द्यावा. पूजा जोशी अरोरा दुसऱ्यांदा आई झाली आहे. 8 वर्षांतील तिची ही दुसरी गर्भधारणा आहे. त्यांनी आपल्या मुलीचे नाव 'रुहानी' ठेवले आहे.
ये रिश्ता क्या कहलाता है' 2009 मध्ये सुरू झाला.हा शो 14 वर्षांपासून छोट्या पडद्याच्या जगावर राज्य करत आहे. अक्षरा आणि नैतिक नंतर, यात कैरव आणि नायराचे प्रेम होते आणि आता अभिमन्यू आणि अक्षरा या शोला पुढे नेत आहेत. अभिनेत्री पूजाला चाहत्यांकडून शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.
Edited by - Priya Dixit