शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. माझा महाराष्ट्र
Written By
Last Modified: शनिवार, 30 नोव्हेंबर 2024 (07:30 IST)

वीरमाता जिजाबाई भोसले प्राणिसंग्रहालय मुंबई

Mumbai zoo
Maharashtra Tourism : महाराष्ट्रातील मुंबई मध्ये असलेले वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान हे मुंबई शहराच्या मध्यभागी स्थित असून जे मुंबई शहरातील सर्वात प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी एक आहे. तसेच हे उद्यान प्राणिसंग्रहालय म्हणूनही ओळखले जाते. या उद्यानाचे नाव मराठा साम्राज्याचे राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आई वीरमाता जिजाबाई यांच्या नावावर आहे. तसेच हे उद्यान 1861 मध्ये बांधले असून हे मुंबईतील एकमेव प्राणीसंग्रहालय आहे जे भारतातील सर्वात जुने प्राणीसंग्रहालय म्हणूनही ओळखले जाते. तसेच या प्राणिसंग्रहालयात आल्यावर सिंह, माकडे, मगरी, हत्ती आणि इतर अनेक वन्य प्राणी वेगवेगळ्या आवारात दिसतात. तसेच इथे विविध प्रकारच्या पक्ष्यांचा चांगला संग्रह आहे. मुंबई प्राणीसंग्रहालय हे 48 एकर परिसरात पसरले असून या प्राणीसंग्रहालयात सस्तन प्राणी, विविध पक्षी आणि सरपटणारे प्राणी देखील आहे. याशिवाय या प्राणिसंग्रहालयात अनेक प्रजातींची झाडे आहे. त्यापैकी बहुतांश झाडे दुर्मिळ आहे. या प्राणीसंग्रहालयात सिंह, कोल्हा, मॉनिटर सरडा, काळवीट, माकड, अस्वल, पाणघोडे, मगर आणि लंगूर यांसारख्या विविध प्राण्यांचे निवासस्थान आहे. 
 
Tiger
वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान इतिहास- 
या प्रसिद्ध प्राणीसंग्रहालयाचा इतिहास 150 वर्षांहून अधिक जुना आहे. सम्राज्ञी, राणी व्हिक्टोरिया यांच्या नावावरून त्याचे नाव देण्यात आले. काही काळानंतर याला राणीची बाग असेही म्हटले जाऊ लागले. असे मानले जाते की काही वर्षांनी हे प्राणीसंग्रहालय मुंबई सरकारला ज्यू व्यापारी मिस्टर डेव्हिड सॅसन यांनी दान केले होते, त्यानंतर हे प्राणीसंग्रहालय मुंबई महापालिकेच्या देखरेखीखाली आहे. तसेच आता त्याचे नाव बदलून वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान करण्यात आले आहे.
  
तसेच मुंबई शहरातील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान म्हणजेच प्राणिसंग्रहालय हे दररोज सकाळी 9 वाजता उघडते व संध्याकाळी 6 वाजता बंद होते. या काळात तुम्ही येथे कधीही भेट देण्यासाठी येऊ शकता.  
 
वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान मुंबई जावे कसे?
विमान मार्ग-
मुंबई येथे असलेले छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ हे देशातील प्रमुख आंतरराष्ट्रीय विमानतळांना जोडलेलं आहे. विमातळावरून कॅप, टॅक्सी, रिक्षा किंवा खासगी वाहनाच्या मदतीने मुंबई प्राणीसंग्रहालयात जाऊ शकता.
 
रेल्वे मार्ग-
या प्राणीसंग्रहालय भायखळा रेल्वे स्थानक समोर स्थित आहे. मध्य रेल्वे मार्गाने येणाऱ्या पर्यटकांसाठी मुंबई प्राणीसंग्रहालय स्टेशनपासून काही मिनिटांच्या अंतरावर आहे. पश्चिम रेल्वे मार्गाने जाण्यासाठी सर्वात जवळचे स्टेशन मुंबई सेंट्रल आहे जिथून टॅक्सीने प्राणीसंग्रहालय पर्यंत पोहचता येते. 
 
रस्ता मार्ग-
मुंबईसाठी राज्याच्या विविध भागातून बस सेवा उपलब्ध आहे. ज्याद्वारे तुम्ही मुंबईला सहज पोहोचू शकता. मुंबईला पोहोचल्यानंतर मेट्रोने किंवा कॅब बुक करून मुंबई प्राणीसंग्रहालयात सहज पोहचता येते. तसेच खासगी वाहनाच्या मदतीने देखील तुम्ही इथपर्यंत पोहचू शकतात.