गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 8 ऑगस्ट 2018 (11:27 IST)

धर्मेंद्र-शत्रुघ्न ही जोडी तब्बल २० वर्षानंतर एकत्र

काही वर्षांपूर्वी ‘यमला पगला दिवाना’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होताया चित्रपटाचा सिक्वल ‘यमला पगला दिवाना फिर से’ प्रदर्शित होणार होता. ‘यमला पगला दीवाना फिर से’ या चित्रपटाच्या माध्यमातून धर्मेंद्र आणि शत्रुघ्न ही जोडी तब्बल २० वर्षानंतर स्क्रिन शेअर करणार आहे. मागील आठवड्यामध्येच या दोघांनी चित्रपटातील काही भागाचं चित्रीकरण पूर्ण केलं असून सेटवरील काही फोटो व्हायरल झाले आहेत. व्हायरल होत असलेल्या या फोटोंमधून धर्मेंद्र एका वकीलाची भूमिका करणार असल्याचं स्पष्ट होत आहे.
 
दरम्यान, मुल्क चित्रपटाप्रमाणेच या चित्रपटामध्ये कोर्ट रुम ड्रामा दाखविण्यात येणार आहे. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून यात धर्मेंद्र आणि शत्रूघ्न सिन्हा यांच्या व्यतिरिक्त सनी देओल आणि बॉबी देओलदेखील झळकणार आहेत.