1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. uddhav thackeray denied meet with dharmendra pradhan

उद्धव ठाकरेंनी पेट्रोलियम मंत्र्यांची भेट नाकारली

uddhav thackeray
केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना उद्धव ठाकरेंनी भेट नाकारलीये. नाणार प्रकल्पाबाबत शिवसेनेची मनधरणी करण्याच्या प्रयत्नात प्रधान आहेत. त्यासाठी गेल्या तीन-चार दिवसांपासून ते उद्धव यांची भेट मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत. सोमवारी नाणार प्रकल्पाबाबत करार झाल्यानंतर शिवसेना अधिक आक्रमक झालीये. प्रकल्प समुद्रा बुडवण्याची भाषा शिवसेनेनं केलीये. हा विरोध बघता उद्धव ठाकरेंचं मन वळवण्याचा प्रधानांचा प्रयत्न आहे.
 
नाणार तेल शुद्धीकरण प्रकल्पाबाबत अबू धाबी आणि केंद्र सरकारमध्ये गुंतवणूक करार झाला आहे. या कराराला थांबवण्याऐवजी गती देण्याचे काम केंद्राकडून जोरात सुरू आहे. हा करार करतांना मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्री यांना अंधारात ठेवले. याबाबत शिवसेनेनं निषेध-विरोध हा मंत्रीमंडळ बैठकीत मुख्यमंत्री यांच्यापुढे नोंदवला आहे.
पुढील लेख
रेल्वेच्या एसी कोचमध्ये चांगले ब्लॅंकेट्स मिळणार