शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

काँग्रेसने विचारले बलात्कारी बाबांशी भाजप नेत्यांच्या नात्याला नाव काय...

काँग्रेसने भाजप नेत्यांवर मोठा हल्ला करत ट्विटरवर सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांसह बलात्कारी बाबांचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओत काँग्रेसने विचारले आहे की बलात्कारी बाबांशी भाजप नेत्यांच्या नात्याला नाव काय...
 
एका मिनिटाच्या या व्हिडिओत अनेक राज्यांचे मुख्यमंत्री बलात्कारी बाबांसोबत दिसत आहे. व्हिडिओत सर्वात आधी राजनाथ फलाहारी बाबासोबत दिसत आहे. नंतर वेगवेगळ्या फोटोत फलाहारी बाबा मध्यप्रदेश मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, यूपी सीएम योगी आदित्यनाथ आणि राजस्थान मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्यासह आहे.
 
नंतर बलात्काराचे आरोपी दाती महाराज यांच्यासोबत क्रीडा मंत्री राज्यवर्धन सिंह राठौर, संघ प्रमुख मोहन भागवत आणि शिवराज सिंह यांचे फोटो आहे. व्हिडिओत हरियाणा सीएम मनोहरलाल खट्टर आणि केंद्रीय मंत्री वीके सिंह गुरमीत राम रहीम सिंह सोबत दिसत आहे.
 
यानंतर क्लिप मध्ये बलात्कारी बाबा आसाराम मध्यप्रदेश मुख्यमंत्री शिवराज आणि छत्तिसगढ सीएम रमनसिंह यांना आशीर्वाद देत आहे. पंतप्रधान मोदी यात आसारामसोबत उभे असलेले दिसत आहे.