1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 14 जून 2018 (09:08 IST)

मारेकऱ्यांच्या हिटलिस्टवर गिरीश कर्नाड यांचेही नाव

girish karnad
ज्येष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश यांच्या हत्येच्या प्रकरणातील संशयित मारेकऱ्यांच्या हिटलिस्टवर प्रख्यात दिग्दर्शक गिरीश कर्नाड यांच्यासहीत आणखी काही नामवंतही होते. ही धक्कादायक माहिती तपास अधिकाऱ्यांनीच दिली. गिरीश कर्नाड यांच्याबरोबरच साहित्यिक बी. टी. ललिता नाईक, निदुमामिदी मठाचे स्वामी वीरभद्र चन्नमल्ला, पुरोगामी विचारवंत सी. एस. द्वारकानाथ यांच्यावरसुद्धा त्या आरोपींचा निशाणा होता.
 
गौरी लंकेश यांच्या हत्येच्या प्रकरणात विशेष तपास पथकाने पराशुराम वाघमारे, के. टी. नवीन ऊर्फ होटे मांजा, अमोल काळे, मनोहर येडवे, सुजीत कुमार ऊर्फ प्रवीण, अमित देगवेकर या सहा जणांना अटक केलेली आहे.