शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 13 जून 2018 (17:06 IST)

आध्यात्मिक गुरु भय्यू महाराज यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

आध्यात्मिक गुरु भय्यू महाराज यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. मध्यप्रदेशातील इंदूरमध्ये भय्यू महाराजांची कन्या कुहू हिने पार्थिवाला मुखाग्नि दिला. सकाळी नऊ वाजल्यापासून साडेबारा वाजेपर्यंत त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. अंत्यसंस्कारापूर्वी सजवलेल्या रथातून भय्यूजी महाराज यांची अंत्ययात्रा सूर्योदय आश्रमातून मुक्तीधाम स्मशानभूमीच्या दिशेनं निघाली. आश्रम परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त करण्यात आला होता. यावेळी हजारो भक्तगण उपस्थित होते. 
 
भय्यू महाराज यांनी इंदूरमधल्या राहत्या घरी गोळी झाडून आत्महत्या केली होती.