शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By

थायलंडच्या राजाच्या फ्युनरलसाठी सोन्याचा रथ

थायलंडचे दीर्घकाळ सत्तेवर असलेले लोकप्रिय राजे भूमिबल अतुल्यलोक यांच्या अंतिम संस्काराची तयारी अंतिम टप्प्यात असून 26 ऑक्टोबरपासून पाच दिवस हा सोहळा साजरा केला जाणार आहे. राजांच्या अस्थी असलेला कलश सोन्याच्या रथातून अंतिम संस्कारच्या जागी आणला जाणार असून या अंत्यसंस्कारासाठी 582 कोटी रूपये खर्च केले जाणार आहेत. 
 
थायलंडचे राजे भूमिबल यांचे गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये निधन झाले होते. त्यांचे अंतिम संस्कार आता करण्यात येणार आहेत. त्यासाठी बँकॉक येथ प्राचीन स्वरूपात स्मशानभूमी उभारली जात असून त्यासाठी गेले दहा महिने कारगीर काम करत आहेत. राजे भूमिबल हे थायलंडचे 9 वे राजे होते व 1946 साली ते राज्यावर आले होते.