1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By

स्त्री- पुरूषांना समान वेतन देणारा जगातील पहिला देश

जगभरात स्त्रिया आणि पुरूष यांच्या वेतनात कमालीची तफावत आढळते. मात्र एका देशाने या विचारसरक्षलाच फाटा दिला आहे.
 
आइसलँड या देशान स्त्री आणि पुरूषांना समान वेतन देणारा पहिला देश बनण्याचा बहुमान मिळवला आहे. या पुढे या देशातील कोणत्याही कंपनीत काम करणार्‍या स्त्री आणि पुरूषांना समान वेतन मिळणार आहे.
 
जगभरात अजूनही कित्येक ठिकाणी एकसमान काम करूनही महिलांना पुरूषांपेक्षा कमी पगार मिळण्याची अनेक उदाहरणे सर्रास दिसतात. पण आइसलँडने मात्र ही प्रॅक्टिस हद्दपार करण्याचे ठरवले आहे. महत्त्वाचे म्हणजे, लिंग समानतेच्या बाबतीत आइसलँह जगात अव्वल स्थानावर आहे.
 
आइसलँडमध्येही आजवर एक समान काम करण्यासाठी पुरूषांना महिलांहून सहा टक्के अधिक वेतन दिले जात होते परंतू सरकारने इक्वल पे स्टँडर्ड नावाने एक नवीन गाईडलाईन जारी केली आहे. या गाईडलाईन अंतर्गत कंपनीच्या प्रत्येक कामाचे मूल्याकंन केले जाईल. त्यातनू कोणते काम किती महत्त्वाचे आहे हे जाणून घेतले जाईल. त्यानंतर प्रत्येक कामाला एक क्रमांक दिला जाईल. जर दोन व्यक्ती एकाच क्रमांक असलेले काम करत असतील तर त्यांचे वेतनही समान असायला हवे.