गुरूवार, 2 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 17 ऑक्टोबर 2017 (17:14 IST)

मलालाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल, झाला ट्रोल

नोबेल पुरस्कार विजेती मलाला युसुफजईचा एक फोटो सोशल मीडियावर सध्या व्हायरल होता. या फोटोत मलाला जीन्स पँट, जॅकेट आणि हेड स्कार्फ अशा वेशभूषेत दिसत आहे. परंतु मलालाच्या कपड्यांमुळे सोशल मीडिया दोन भागात विभागला गेला आहे. मलालाच्या कपड्यांमधील बदलाचे स्वागत करत ती सामन्य मुलीप्रमाणेच दिसत आहे, असे काहींनी म्हटले आहे. तर दुसरीकडे मलालाचे कपडे पाकिस्तानी मुलीसाठी लाजिरवाणी बाब असल्याचे काहींच मत आहे.

कपड्यांवरुन तिला ट्रोल करायला सुरुवात केली. पॉर्नस्टार मिया खलिफाशी तिची तुलना करुन ट्रोलर्सनी टोक गाठलं. फोटोत दिसणारी मुलगी मलालाच आहे की दुसरी कोणी हे अजून स्पष्ट झालेलं नाही. पाकिस्तानी वेबसाईट ‘Siasat.pk’ ने मलाला युसुफजई युकेमध्ये या कॅप्शनसह तिचा जीन्स घातलेला फोटो आपल्या फेसबुक पेजवर शेअर केला आहे. हा फोटो तुफान व्हायरल होत असून हजारोंनी त्यावर कमेंट केली आहे.