1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 7 जून 2018 (09:02 IST)

अमित शाह आणि उद्धव ठाकरे यांची बैठक सकारात्मक

Amit Shah
भाजपाध्यक्ष अमित शाह आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात बैठक पार पडली असून यावेळी सकारात्मक चर्चा झाली आहे. दोघांमध्ये जवळपास दोन तास चर्चा सुरु होती. यावेळी नेमकी काय चर्चा झाली हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे.
 
भेटीआधी भाजपावर टीका करणारी शिवसेना पुन्हा एकदा मवाळ होताना दिसत आहे. कारण अमित शाह आणि उद्धव ठाकरे येत्या महिन्यात दोन ते तीन बैठका घेणार आहेत. समन्वय वाढवण्यासाठी दोन्ही पक्षांनी हा निर्णय घेतला आहे. मागील चार वर्षांपासून शिवसेना-भाजपामध्ये असलेली नाराजी आणि मतभेदांची दरी दूर करणे हा या बैठकीमागे महत्वाचा उद्देश होका. स्वत: भाजपा अध्यक्षांनी युतीची तयारी दाखवली आहे. मित्रपक्षांमध्ये मतभेद होत असतात असे शहा म्हणाले. त्यामुळे मैत्रीचा चेंडू आता शिवसेनेच्या कोर्टात आहे.