रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By

माधुरी जाणार राज्यसभेत ?, शाह भेटीत प्रस्ताव दिला का?

धकधक गर्ल म्हणून प्रसिद्ध असलेली सध्या जास्त कामात नसलेली अभिनेत्री माधुरी दीक्षितला भाजपकडून राज्यसभेची ऑफर देण्यात आली आहे. याबाबत चर्चा सुरु झाली आहे.

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी संपर्क फॉर समर्थन  अभियानातंर्गत माधुरी दीक्षितची घरी जाऊन भेट घेतली आहे. तेव्ह्या त्यांनी विविध विषयांवर चर्चा केली. मात्र माधुरीला राज्यसभेवर पाठवण्याची   प्रकारच्या कुठल्याही ऑफरचा इन्कार भाजपकडून करण्यात आला आहे. आज दुपारी  अमित शाह माधुरी दीक्षितच्या घरी पोहोचले होते. त्यांच्यासोबत  राज्याचे  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, विनोद तावडे, भाजपचे सरचिटणीस अनिल जैन यांची उपस्थिती होती. तर माधुरीच्या घरी पती श्रीराम नेने आणि मुलगाही उपस्थित होता. संपर्क फॉर समर्थन या अभियाना अंतर्गत यापूर्वी अमित शाहांनी कपिल देव यांचीही भेट घेतली होती.