मंगळवार, 31 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: नवी दिल्ली , शुक्रवार, 23 मार्च 2018 (08:58 IST)

राज्यसभेच्या 58 जागांसाठी आज मतदान

राज्यसभेच्या 58 जागांसाठी व एका लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी 16 राज्यांमध्ये आज मतदान होणार आहे.दरम्यान राज्यसभा निवडणुकीचे निकाल भाजपासाठी अनुकूल लागल्यास भाजप बहुमताच्या आणखी जवळ जाण्याची शक्यता आहे.
 
या फेरीत उत्तर प्रदेश,मध्य प्रदेश ,राजस्थान, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश बिहार, गुजरात, हरयाणा, तेलंगण या राज्यांचा समावेश आहे. सध्या राज्यसभेत कुठल्याच पक्षाला बहुमत नाही. भाजपकडे 58 तर काँग्रेसकडे 54 जागा आहे. या निवडणुकांनतर भाजप बहुमताच्या अधिक जवळ पोचेल. उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यांमधून जास्त जागा मिळायची भाजपला अपेक्षा आहे. त्यात उत्तर प्रदेशमधून सर्वाधिक 10 जागांसाठी मतदान होणार आहे.