सोमवार, 30 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

तीन तलाक विधेयक: काँग्रेसचा विरोध, राज्यसभेत मंजूरी नाही

तीन तलाकच्‍या विधेयकात तीन वर्षांच्‍या शिक्षेच्‍या तरतुदीला काँग्रेसने विरोध केला आहे. हिवाळी अधिवेशनाच्‍या मागील तीन दिवसांत राज्‍यसभेत तीन तलाकच्‍या मुद्‍द्‍यावरून मोठा गदारोळ निर्माण झाला होता. त्‍यामुळे या विधेयकावर सरकार चर्चा करू शकली नाही. काँग्रेस यावर संसदीय समिती स्‍थापन करुन हे विधेयक त्‍या समितीकडे पाठवण्‍याची मागणी करत आहे. तीन तलाक विधेयकात अनेक त्रुटी असल्‍याचे काँग्रेसचे म्‍हणणे आहे. 
 
तीन तलाकवर विधेयक राज्‍यसभेत मंजूर व्‍हावे, याकरिता भाजप सरकार प्रयत्‍न करत आहे. मात्र, विरोधी पक्ष नेते या विधेयकाला विरोध करत आहेत. राज्यसभेत भाजपचे संख्‍याबळ कमी असल्‍याने हे विधेयक रखडले. संसदेच्‍या हिवाळी अधिवेशाचा हा शेवटचा दिवस आहे. या अधिवेशनाच्‍या काळात लोकसभेत तीन तलाक विरोधात विधेयक मंजूर झाले. राज्‍यसभेत विधेयक सादर करण्‍यात आले. मात्र, राज्‍यसभेत बहुमत नसल्‍याकारणाने मंजूर झाले नाही.