सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

संसदेचे हिवाळी अधिवेशन 15 डिसें. ते 5 जाने.

संसदेचे हिवाळी अधिवेशन 15 डिसेंबर ते 5 जानेवारी दरम्यान होणार आहे. याबाबतची घोषणा करण्यात आलेली आहे. गुजरातचं दोन्ही टप्प्यातलं मतदान 14 डिसेंबरला पूर्ण झाल्यानंतरच हिवाळी अधिवेशन सुरु होणार आहे. हिवाळी अधिवेशन लांबणीवर टाकल्यानं गेल्या काही दिवसांपासून जोरदार आरोप प्रत्यारोपांचं राजकारण सुरु होतं.
 
गुजरात निवडणुकीच्या तोंडावर सरकारला काही नको असलेल्या विषयांची चर्चा टाळायचीय, त्यामुळेच संसदेच्या अधिवेशनाला वेठीस धरलं जात असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता.