गुरूवार, 2 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन,येत्या ११ डिसेंबरपासून

नागपूर येथे भरणारे राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या ११ डिसेंबरपासून सुरू होणार असून २२ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. रविवारची सुटी वगळता केवळ दहा दिवस कामकाज होणार असून या कालावधीत १३ विधेयके, ११ अध्यादेश आणि विधान परिषदेतील प्रलंबित विधेयके मान्यतेसाठी सभागृहात मांडण्यात येणार आहेत. संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी ही माहिती दिली.
 
येत्या ११ ते २२ डिसेंबरदरम्यान हिवाळी अधिवेशन असेल आणि २१ तारखेला अंतिम आठवडा प्रस्ताव मांडणार येणार आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अधिवेशनाचा कालावधी वाढविण्याची मागणी केली होती, त्याकडे लक्ष वेधले असता याबाबत निर्णय घेण्यासाठी २० डिसेंबर रोजी पुन्हा एकदा कामकाज सल्लागार समितीची बैठक घेतली जाईल, असे बापट यांनी सांगितले.