1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 23 ऑक्टोबर 2017 (10:40 IST)

अहो आश्चर्यम : नागपूरमध्ये प्रदूषण कमी झाले

नागपूर शहरात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्यावतीने दिवाळीच्या दिवसातील प्रदुषणाचे प्रमाण मोजण्याकरिता शहरातील अंबाझरी, सिव्हील लाईन्स, सदर, हिंगणा या चार ते पाच ठिकाणांवरच प्रदुषण मापक लावले जातात.  या ठिकाणी प्रदूषण कमी झाल्याचे दिसून आले आहे. सोबतच फटाक्यांची आतिशबाजी बरीच कमी होती. ग्रीन विजिलसारख्या पर्यावरणावर काम करणाऱ्या संस्थांनी याचे श्रेय प्रसारमाध्यमांना दिले आहे. माध्यमांची भूमिका यात महत्त्वाची असून फटाके मोठय़ा प्रमाणावर फोडू नये, फटाक्यांमुळे होणारे प्रदूषण, त्याचा आरोग्यावर होणारा दुष्परिणाम आदींविषयी जनजागृती करण्यात आली. दुसरे एक कारण म्हणजे फटाक्यांच्या किंमती गगणाला भिडणाऱ्या असल्याचे बोलले जात आहे.