सोमवार, 29 डिसेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 21 ऑक्टोबर 2017 (12:38 IST)

ट्रक पलटी होवून भीषण अपघात,१० ठार, १३ जखमी

truck accident

सांगली जिल्ह्यातील मणेराजुरीजवळ फरशी वाहतूक करणारा ट्रक पलटी होवून झालेल्या भीषण अपघात झाला आहे. यात १० जण ठार तर १३ जण जखमी झालेत. मृतांमध्ये ५ स्त्रिया आणि ५ पुरुष आहेत. हा ट्रक लादी घेऊन कर्नाटकमधून कराडला जात होता.  या अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. तासगाव-कवठेमहांकाळ मार्गावर हा भीषण अपघात झाला आहे.  शनिवारी पहाटे दोन ते तीन वाजेच्या सुमारास हा अपघात झाला आहे. 

कर्नाटकातून कराडमध्ये मजुरी करायला येण्यासाठी १९ ते २० मजूर या ट्रकने प्रवास करत होते. त्यावेळी तासगाव- कवठेमहांकाळ मार्गावर योगेवाडीजवळ ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला.