सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 16 ऑक्टोबर 2017 (16:50 IST)

११ राज्ये रियल टाइम रँकिंगमध्ये शुन्यावर

देशातील 11 राज्य अशी आहेत  की जिथे जी जागतिक बँक आणि डीआयपीपीच्या रियल टाइम रँकिंगमध्ये शुन्यावर आहे. यात भाजपशासित मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड सह मेघालय, सिक्किम, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोराम, लक्ष्यद्विप, अंदमान-निकोबार यांचा ही समावेश आहे. या ठिकाणी ईज ऑफ डुइंग बिझनेस रँकिंग सुधारणा करण्याची गरज आहे. 
डीआयपीपी आणि जागतिक बँकेने मिळून एप्रिल 2017 मध्ये ईज ऑफ डुईंग बिझनेससाठी एक अॅक्शन प्लॅन तयार केला होता.  या योजनेनुसार राज्यांमध्ये सुधारणेसाठी 405 शिफारशी केल्या होत्या. त्यानुसार राज्यांना आपल्या येथे अॅक्शन प्लॅन लागू करायचा होता, आणि त्या दिशेने पाऊले उचलून सुधारणा करायच्या होत्या. याच अॅक्शन प्लॅननुसार रँकिंग देण्यात आली. याचा अर्थ ज्या राज्यांनी जेवढ्या जास्त सुधारणा केल्या तेवढी त्यांची रँकिंग असते.  झिरो रँकिंगचा अर्थ या राज्यांनी त्या दिशेने कोणतेच काम केलेले नाही. या रँकिंगमध्ये महाराष्ट्रही फार काही महत्त्वाची कामगिरी करु शकलेले नाही. महाराष्ट्रचा क्रमांक रँकिंगमध्ये 5वा राहिला आहे.