रविवार, 24 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

टाटा टेलिसव्हिसेसचे विलिनीकरण

दूरसंचार कंपनी टाटा टेलिसव्हिसेसचे विलिनीकरण आता भारती एअरटेलमध्ये होणार आहे. या नव्या विलीनीकरणामुळे टाटा टेलिसर्व्हिसेस आणि टाटा टेलिसर्व्हिसेस महाराष्ट्रातील चार कोटी ग्राहक भारती एअरटेलशी जोडले जाणार आहे. या सौद्यामुळे टाटा आपल्या टेलिकॉम क्षेत्रातील आर्थिक अडचणीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहे. 
 
या करारानुसार कोणतेही कर्ज नाही किंवा रोख रक्कम नाही असे ठरविण्यात आले आहे. त्यामुळे एअरेटल यात टाटा सर्व्हिसेसच्या ४० हजार कोटी रुपयांच्या कर्जात कोणतीही भागीदारी नाही करणार किंवा त्यांना कोणत्याही प्रकारचे रोख रक्कम देणार आहे. टाटा कडून खरेदी करण्यात आलेले स्पेक्ट्रेम साठी ९००० ते १०००० कोटी रुपयांतील ७० ते ८० टक्के हिस्सा टाटाच भरणार आहे.