1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: नवी दिल्ली , सोमवार, 2 ऑक्टोबर 2017 (10:12 IST)

‘एसबीआय’च्या खातेधारकांसाठी ‘हे’नवे नियम

देशात स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (एसबीआय) खातेधारकांसाठी नवे नियम लागू करण्यात येणार आहेत. या नव्या नियमांबाबत माहिती  जाणून घेऊ यात.
 
एसबीआयकडून खातेधारकांना दिलासा- एसबीआयने मेट्रो शहरांमध्ये खात्यात किमान रक्कम ठेवण्याची मर्यादा 5 हजारांहून 3 हजार रुपये केली आहे. यामुळे जवळपास 5 कोटी ग्राहकांना फायदा होईल. शिवाय यावरील दंडाच्या रक्कमतेही कपात करण्यात आली आहे. यापूर्वी किमान रक्कम न ठेवल्यास 40 ते 100 रुपये वसूल केले जात होता. त्यावर सर्व्हिस टॅक्सही होता. मात्र आता ही मर्यादा 30 ते 50 रुपये करण्यात आली आहे. सततचा विरोध आणि सरकारच्या आवाहनानंतर एसबीआयने हा निर्णय घेतला. एसबीआयने पेन्शन धारक, सरकारी योजनांचे लाभार्थी आणि अल्पवयीन खातेधारकांना किमान रक्कम ठेवण्याच्या मर्यादेतून बाहेर ठेवलं आहे.
 
जुने खाते बंद करण्यासाठी फी नाही- एसबीआयमधील खाते बंद करण्यासाठी फी लागणार नाही. मात्र खाते एका वर्षापेक्षा अधिक दिवसांचे असणं गरजेचे आहे. एखादं खातं 14 दिवसांनंतर आणि एका वर्षाच्या आत बंद केल्यास 500 रुपये आणि जीएसटी द्यावा लागेल.
 
जुने चेक होणार रद्द- ज्या ग्राहकांकडे एसबीआयमध्ये मर्ज झालेल्या बँकांचे चेक आहेत, ते चेक यापुढे अमान्य करण्यात येतील. या बँकांचे जुने चेक आणि आयएफएससी कोड 30 सप्टेंबरनंतर चालणार नाहीत.