गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

एसबीआयच्या बचत खात्यात 3 हजार रुपये बॅलन्स बंधनकारक

स्टेट बँक ऑफ इंडियाने शहरी भागातील  बचत खात्यामध्ये महिन्याला कमीत कमी 5 हजार रुपये बॅलन्स बंधनकारक करण्याच्या आपल्या निर्णयात बदल केला आहे. यापुढे एसबीआयच्या खातेधारकांना अकाऊंटमध्ये 3 हजार रुपये बॅलन्स बंधनकारक असेल. वेगवेगळया श्रेणीमध्ये आवश्यक बॅलन्स न ठेवल्यास आकारण्यात येणा-या दंडाची रक्कमही 20 ते 50 टक्क्यांनी कमी करण्यात आली आहे. 
 
1 ऑक्टोंबरपासून नव्या नियमांची अंमलबजावणी सुरु होईल असे बँकेकडून सांगण्यात आले. एसबीआयच्या वेबसाईटवरील माहितीनुसार शहरी भागातील एसबीआयच्या खातेधारकांना बचत खात्यामध्ये कमीत कमी 3 हजार, निम शहरी भागातील खातेधारकांना 2 हजार आणि ग्रामीण भागातील खातेधारकांना 1 हजार रुपये अकाऊंटमध्ये ठेवणे बंधनकारक असेल.