गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

महान उद्योगपतींच्या यादीत तीन भारतीय

न्यूयॉर्क- आता फोर्ब्सने नुकत्याच जाहीर केलेल्या 100 महान आणि सध्या हयात असलेल्या उद्योगपतींच्या यादीत तीन भारतीय उद्योगपतींना स्थान मिळाले आहे. 
 
या तीन भारतीयांमध्ये टाटा उद्योग समूहाचे माजी संचालक रतन टाटा, आर्सेलर मित्तल या जगातील सगळ्यात मोठ्या स्टील कंपनीचे सीईओ आणि संचालक लक्ष्मी मित्तल तसेच खोसला व्हेंचर्सचे संस्थापक विनोद खोसला यांचा या यादीत समावेश करण्यात आला आहे. या उद्योगपतींचा समावेश अशा जागतिक यादीत असणे ही अभिमानाचीच गोष्ट आहे. मात्र, आश्चर्यची बाब म्हणजे भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांचा या यादीत समावेश नाही.