रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 19 सप्टेंबर 2017 (11:36 IST)

पेट्रोल-डिझेलचे दर दिवाळीपर्यंत कमी होणार

अमृतसर -दिवाळीपर्यंत पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होण्याची शक्‍यता केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली आहे. दिवसेंदिवस किमतीमध्ये सातत्याने होणाऱ्या वाढीविरोधात विरोधकांची टीका सुरू आहे. दरम्यान प्रधान यांनी असा अंदाज वर्तवला आहे.
 
सरकारने नुकतेच इंधनाच्या दरांचे रोज मूल्यांकन करण्यास मंजुरी दिली आहे. काही कामानिमित्त अमृतसर येथे आले असताना प्रधान म्हणाले, इंधनचे दर दिवाळीपर्यंत कमी होऊ शकतात. अमेरिकेत आलेल्या पुरामुळे तेल उत्पादन 13 टक्के कमी झल्याने रिफायनरी तेलाच्या किमती वाढल्या आहेत.