शुक्रवार, 17 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 22 सप्टेंबर 2017 (09:20 IST)

सोन्याच्या दरात घट

सराफा व्यापाऱ्यांची मागणी वाढत असतानाही सोन्याच्या किमतीत घट झाली आहे. दिल्लीतील सराफ बाजारात  सोन्याच्या किंमतीत २५० रुपये प्रति ग्रॅमने घट झाली आहे. त्यामुळे सोन्याची किंमत ३०,५०० रुपये तोळा एवढी झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमतीत तीन आठवड्यांमधील सर्वात जास्त घट झाली आहे. इतकेच नाही तर चांदीच्या किंमतीतही घट झाल्याचं पहायला मिळत आहे. बाजारातील तज्ञांच्या मते, जगभरातील इतर प्रमुख मुद्रांच्या तुलनेत डॉलरची मजबूत स्थिती आणि फेडरल रिझर्व्हद्वारा व्याज दरात वाढ करण्याची घोषणेमुळे धातूवर परिणाम झाला आहे.