शुक्रवार, 29 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Updated : शनिवार, 23 सप्टेंबर 2017 (10:44 IST)

महागाईप्रश्नी शिवसेना आक्रमक, मुंबईत विभागवार 12 मोर्चे काढणार

shiv sena

महागाईविरोधात आक्रमकतेची भूमिका घेत शिवसेना आता पासून रस्त्यावर उतरणार आहे. पेट्रोल दरवाढीचा भडका उडाला असताना, दिवसेंदिवस होत असलेल्या महागाईला शिवसेनेनं विरोध दर्शवला आहे. शिवसेना मुंबईत 12 विभागवार मोर्चे काढणार असून शनिवारी  पहिला मोर्चा हा बोरिवलीत होणार आहे.

दुर्देवानं ही वेळी आमच्यावर आली असून सत्तेत असलो, तरी सत्तेची चावी ज्यांच्या हातात आहे, त्यांनी ही भाववाढ केल्याचं शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी म्हटलं आहे. सत्तेत असलेल्या शिवसेनेने यापूर्वीही शेतकरी कर्जमाफीवरुन राज्यभरात मोर्चे काढले होते. त्यानंतर आता शिवसेना पेट्रोल दरवाढ आणि महागाईच्या मुद्द्यावरुन सरकारला घेरण्याच्या तयारीत आहे.