गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 23 सप्टेंबर 2017 (10:32 IST)

15 आमदार मिळवून देण्याची जबाबदारी माझी :आठवले

शिवसेनेनं पाठिंबा काढला तरी सरकार पडणार नाही, त्यांना 15 आमदार मिळवून देण्याची जबाबदारी मी घेतली आहे, असं वक्तव्य रिपाइं नेते रामदास आठवले यांनी केलं आहे. राज्यातल्या जनतेवर इतक्या लवकर निवडणुकांचा बोजा मी पडू देणार नाही, असं आठवले म्हणाले.रामदास आठवले यांनी अमरावतीत आयोजित पत्रकार परिषदेत केला.

शिवसेनेने फडणवीस सरकारचा पाठिंबा काढला, तरीही सरकार पडणार नाही. कारण 15 आमदार आणण्याची जबाबदारी मी स्वतः घेतली आहे. आम्ही निवडणुकीला सामोरे जाण्यास पूर्णपणे तयार आहोत. मात्र सरकार पडणारच नाही, कारण शरद पवार हे आतून आमच्या सोबत आहेत, असा दावा त्यांनी केला आहे.