गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

बँक लॉकरमधील वस्तूची जबाबदारी बँकेची नाही

बँकेतील लॉकरमध्ये ठेवण्यात आलेल्या वस्तू चोरीला गेल्यास बँक जबाबदार नसेल. माहिती अधिकाराअंतर्गत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून हे स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. लॉकरमध्ये ठेवलेल्या मौल्यवान वस्तू किंवा दागिने चोरीला गेल्यास नुकसान भरपाईबद्दल कोणतेही निर्देश बँकांना जारी करण्यात आलेले नाहीत, असं आरबीआयने स्पष्ट केलं आहे. यामध्ये सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचाही समावेश आहे.

लॉकर भाडेतत्त्वावर घेताना बँकेच्या ग्राहकांशी केल्या जाणाऱ्या करारात यासंदर्भात कुठलाही उल्लेख नाही. त्यामुळे युद्ध, आंदोलन, चोरी किंवा दरोडा अशा कुठल्याही परिस्थितीत बँकेतल्या लॉकरमधून कोणतीही वस्तू गहाळ झाली, तरी त्याला संपूर्णपणे संबंधित खातेदारच जबाबदार राहील, असं रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले आहे.