बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 22 मार्च 2018 (17:17 IST)

राज्यसभा निवडणूक : क्रॉस वोटिंगमुळे बिघडू शकतो खेळ

राज्यसभा निवडणुकीबद्दल यूपीत बरीच गहमागहमी आहे आणि यामुळेच सपा, बसपा, भाजप आणि काँग्रेसमध्ये बैठकी सुरू आहेत. महत्त्वाचे म्हणजे निवडणुकीत क्रॉस वोटिंगची शंका सर्व दलांना आहे म्हणून सर्वजण आपापल्या प्रयत्नात आहे.  
 
लखनौ : राज्यसभा निवडणुकीबद्दल यूपीत फार गहमागहमी आहे. यंदा युपी कोट्यातून राज्यसभेसाठी 10 संसद निवडून येतील. सर्वात जास्त दारोमदार अखिलेश यादव यांच्यावर आहे कारण त्यांच्यावर सपा उमेदवार सोबतच बसपा उमेदवारांना देखील राज्यसभेत पोहोचवण्याची जबाबदारी आहे.   
 
पण जाणकारांचे म्हणणे आहे की मायावती विजयासाठी जास्त आश्वस्त नव्हती म्हणून त्यांनी स्वत: राज्यसभाचे रण न लढता भीमराव आंबेडकर यांना उमेदवार बनवले. दाव जर योग्य पडला तर भीमराव आंबेडकर राज्यसभेत पोहोचतील पण जर क्रॉस वोटिंग होते तर अडचणी अधिक वाढतील.  
 
असे नाही आहे की क्रॉस वोटिंगची आशंका फक्त बसपा आणि सपालाच आहे. भाजपला देखील क्रॉस वोटिंगची आशंका आहे. सीएम योगी आदित्यनाथ यांनी भाजपचे सर्व विधायकांना आपल्या घरी जेवायला बोलावले होते ज्याचे मुख्य कारण म्हणजे सर्वांच्या मनातील समजता येईल. अमित शहा यांच्याशी भेटीनंतर सुहेलदेव समाज पार्टीचे अध्यक्ष ओमप्रकाश राजभर देखील या मेजवानीत सामील जाले होते. या अगोदर ते भाजपशी नाराज होते. भाजपचे सहयोगी पार्टी आपल्या पक्षाचे सर्व 9 एमएलए, नुकतेच भाजपमध्ये सामील झालेले नरेश अग्रवाल यांचे विधायक बेटे नितिन देखील, अपक्ष विधायक अमनमणि त्रिपाठी आणि विजय मिश्र देखील मेजवानीत पोहोचले.  
 
अखिलेश यादव यांनी आपले सहयोगी आणि विधायकांसाठी डिनर ठेवला होता. या डिनरमध्ये सपा विधायकांशिवाय निर्दलीय विधायक राजा भैया आणि विनोद सरोज देखील पोहोचले होते. सपाजवळ 47 विधायक आहे. जया बच्चन यांच्या विजयासाठी गरजेचे 37 मतानंतर पक्षाजवळ 10 मत वाचतात. बीएसपीचे 19, काँग्रेसचे 7 आणि आरएलडीचे एक विधायक आहे. या सर्वांना जोडल्यानंतर 35 मत होतात. यात जर राजा भैया आणि विनोद सरोज यांचे मत जोडले तर हा आकडा 37 पर्यंत पोहोचू शकतो. यामुळे बीएसपीचे उमेदवार  भीमराव अंबेडकर यांचा विजय निश्चित आहे.