मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 21 डिसेंबर 2017 (15:32 IST)

राज्यसभेत सचिनचा आवाज बंद, प्रथमच बोलणार होता

क्रिकेट विश्वात अनेक गोलंदाजाना पाणी पाजणाऱ्या सचिन मात्र राज्यसभेत बोलू शकला नाही. राज्यसभेत गोंधळ सुरु असल्याने त्याला काहीच बोलता आले नाही. विशेष म्हणजे सचिन प्रथमच बोलणार होता. त्याला तेही जमले नाही. खासदार  तेंडुलकरची राज्यसभेत चांगलीत दमछाक झालेली पहायला मिळाली. सचिन तेंडुलकर आज राज्यसभेत 'राईट टू प्ले'वर बोलणार होता. तो यासाठी परवानगी घेतली आणि  बोलण्यासाठीउभादेखील राहिला. मात्र दुसरीकडे विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माफी मागण्याचा मुद्दा जोर लावून धरला आणि सभेत त गदारोळ घालण्यास सुरुवात केली. यामध्ये मितभाषी तेंडूलकरने बोलण्याचा बराच प्रयत्न केला होता.  विरोधकांनी मात्र त्याला एक शब्दही बोलू दिला नाही. सचिनला बोलता यावा म्हणून स्वतः उपराष्ट्रपती राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी विरोधकांना सचिन स्पोर्ट्सच्या बोलतोय मात्र  शांत राहण्याची विनंती केली होती. मात्र विरोधकांनी आपला गदारोळ सुरुच ठेवला. यानंतर राज्यसभेचं कामकाज शुक्रवारपर्यंत स्थगित करण्यात आलं आहे. त्यामुळे आता सचिनला कळले असेल की मैदान बरे होते मात्र लोकप्रतिनिधी होणे किती अवघड आहे.